WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Sunday, January 26, 2014

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस
200px
नेताजी सुभाषचंद्र बोस
टोपणनाव: नेताजी
जन्म: २३ जानेवारी, १८९७
कटक, ओडिशा, भारत
मृत्यू: १८ ऑगस्ट, १९४५ (वय ४८)
तैहोको, तैवान
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
फॉरवर्ड ब्लॉक
आझाद हिंद फौज
प्रमुख स्मारके: पोर्ट ब्लेर येथील स्मारक
धर्म: हिंदू
पत्नी: एमिली शेंकल
अपत्ये: अनिता बोस फफ


सुभाषचंद्र बोस (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু सुभाष चॉन्द्रो बॉसु) (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५?) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.

नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखिल असेच मानत होते.
अनुक्रमणिका [लपवा]
१ जन्म व कौटुंबिक जीवन
२ शिक्षण व विद्यार्थी जीवन
३ स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य
४ कारावास
५ युरोपातील वास्तव्य
६ हरीपुरा कॉंग्रेसचे अध्यक्षपद
७ कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा
८ फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
९ नजरकैदेतून पलायन
१० नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट
११ पूर्व आशियातील वास्तव्य
१२ बेपत्ता होणे व मृत्युची बातमी
१३ भारतरत्न पुरस्कार
१४ संदर्भ
१५ हेही पाहा


जन्म व कौटुंबिक जीवन[संपादन]

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.

जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.

प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.

प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.

आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.
शिक्षण व विद्यार्थी जीवन[संपादन]

लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाष मधली सुप्त देशभक्ती जागृत केली.

वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाष ने महाविद्यालयात संप पुकारला होता.

१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य[संपादन]



इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०